ही कादंबरी पारलिंगी व्यक्तींच्या ‘सांस्कृतिक अदृश्यते’ला एक चांगले प्रत्युत्तर देते, त्यांच्या ‘सांस्कृतिक घुसमटी’ला वाचा फोडते आणि एलजीबीटी इत्यादी समुदायाच्या ‘विद्रोही संस्कृती’चा एक सुंदर नमुना पेश करते!

एका पारलिंगी स्त्रीला नायिका म्हणून दाखवून - तिच्या इच्छा, आकांक्षा, भावना, तिचे विचार, तिचा प्रेमासाठीचा शोध - ही कादंबरी तिला ‘वेगळी’, ‘विचित्र’ म्हणून नाही, तर तुमच्या-आमच्या सर्वांसारखीच एक ‘माणूस’ म्हणून समोर ठेवते. पारलिंगी व्यक्तींना ‘माणूस’ म्हणून अशी आदराची वागणूक देणारी ही कादंबरी मराठी साहित्यातील पितृसत्ताक, विषमलिंगी नियमाच्या चित्रणाच्या इतिहासाला जोरकसपणे छेद देते.......